मनपा आयुक्तांचा इशारा
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता येत्या १० जुलैपासून कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संचार बंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी तब्बल चारशे कर्मचाऱ्यांचे पथकच शहरात तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे खबरदार ! घराबाहेर पडाल... तर असा इशाराच आज मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिला.
या वेळेची संचार बंदी ही अत्यंत कडाक असणार आहे. येत्या दहा जुलै पासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीही घराबाहेर पडता कामा नये. ही दुचाकी रस्त्यावर आढळली तर थेट गुन्हा दाखल करून जप्त करण्यात येणार आहे. चालकाचे लायसन्स रद्द करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा, भाजिपाला यासह बँकाही बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही कारण सांगून नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. रस्त्यावर फिरताना दिसले तर कठोर कारवाई करण्यात येईल. दुचाकी अथवा चारचाकी रस्त्यावर दिसली तर वाहन जप्त करण्यात येईल.
चारशे कर्मचाऱ्यांचे पथक !
संचार बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला तब्बल चारशे कर्मचाऱ्यांचे एक पथकच वेगवेगळ्या विभागात तैनात करण्यात येणार आहेत. रस्त्यावर कुणीही फिरतांना दिसणार नाही याची काळजी हे पथक घेईल. त्याचबरोबर विनाकारण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेची संचारबंदी कडक म्हणजे कडकच असे आयुक्तांनी ठासून सांगितले.












